Author avatar
Dr. Shivaji Jadhav

डॉ. शिवाजी जाधव हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील पत्रकारिता व जनसंवाद अधिविभागात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांना माध्यम क्षेत्रातील 16 वर्षांचा अनुभव आहे. डॉ. जाधव हे मूळचे पत्रकार असून त्यांनी गोवा आणि महाराष्ट्र या राज्यात पत्रकारिता केली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक लोकमत आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील आघाडीचे दैनिक पुढारी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार, उपसंपादक, मुख्य उपसंपादक, वृत्तसंपादक आणि सहयोगी संपादक म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. मीडिया आणि चालू घडामोडींवर त्यांची 10 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक म्हणूनही काम पाहतात. डिजिटल आणि डेटा जर्नालिझम तसेच नव माध्यमातील आशय त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.

Books by Dr. Shivaji Jadhav
Other author
Publish Book Now
close slider








Note: This question makes sure that you are not a robot.